सिनेजगत

प्रतिगामी विचारसरणीच्या भूमिका साकारणार नाही : चिन्मय मांडलेकर

मुंबई : कोणतीही भूमिका साकारण्यापूर्वी त्या चित्रपटाचे म्हणणे काय आहे हे जाणून घेतल्यावरच भूमिका स्वीकारत आहे. लोकांना चुकीचा संदेश देणारे किंवा प्रतिगामी विचारांची भूमिका असणारे चित्रपट मी कधीही करणार नाही, असे अभिनेता चिन्मय मांडलेकर याने सांगितले आहे.

अनेकदा कलाकारांना चित्रपटाची ऐकलेली कथा आणि प्रेक्षक चित्रपटगृहांत पाहात असलेला चित्रपट यात बरीच तफावत असते. कारण बऱ्याच गोष्टी या कलाकारांच्याही हातात नसतात, अशी खंतही चिन्मयने यावेळी व्यक्त केली आहे. अनेकदा कलाकारांच्या हातात दिलेल्या संहितेत चित्रिकरणादरम्यान अनेक बदल होतात. त्यामुळे त्या भूमिकेची वेगळीच प्रतिकृती मोठ्या पडद्यावर दिसते, असेही त्याने सांगितले.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये