पुणे शहर

कसबा पेठेत पुन्हा लागले बॅनर; पाहा काय लिहिलंय…

पुणे : कसबा पेठेत पोटनिवडणुकीत चुरस भरू लागली असतानाच आता अनोखे बॅनर लागल्याने चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमधून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात पुणेकरांचा नाद करायचा नाय असंच म्हणावे लागेल.

आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा, कसबा हा गाडगीळांच्या, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा, आम्ही दाबणार नोटा, असे म्हटलेले हे पोस्टर नेमके कुणी लावले हे अजून समजू शकलेले नाही.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर भाजप कडून मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र भाजप कडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याची भावना मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाजामध्ये निर्माण झाल्याची चर्चा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आहे. या पार्श्वभुमीवर अशा प्रकारे लागणारे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत.

Img 20221228 wa000128129390617609791042356

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये