सिध्दी गार्डन डीपी रस्त्यावरील मंगल कार्यालयांच्या आवाजामुळे स्थानिक नागरिक त्रस्त; हिमाली सोसायटीचे पोलिसांना पत्र

पुणे: सिध्दी गार्डन डीपी रस्त्यावरील मंगल कार्यालये आणि बॅक्वेट मधील साऊंड सिस्टीम च्या आवाजामुळे एरंडवणे भागातील हिमाली सोसायटीतील आणि परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रोज संध्याकाळी व रात्री खुप मोठ्या व कर्कश आवाजामुळे हिमाली सोसायटीतील रहिवाश्यांना खुप त्रास होत आहे. याबाबतीत हिमाली सोसायटीच्या वतीने सेक्रेटरी रूपा हुडेकर यांनी अलंकार पोलीस ठाण्या मध्ये लेखी तक्रार केली आहे.
रूपा हुडेकर यांनी पोलीसांकडे केलेल्या तक्रारी नुसार डिपी रस्त्यावरील मंगल कार्यालये आणि बॅक्वेट यामधून येणाऱ्या आवाजामुळे घरामध्ये सुद्धा जोरात बोलावे लागते व टि व्ही चा आवाज सुद्धा प्रचंड मोठा करावा लागतो. या आवाजामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तसेच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे डीपी रस्त्यावरील मंगल कार्यालय व नवीन उंच बहुमजली Galaxy One इमारत मधील लाऊडस्पीकर मधून येणार खुप मोठा आवाज Galaxy One इमारत आणि बॅक्वेट हे हिमाली सोसायटीच्या मागून जाणाऱ्या नाल्या लगतच आहेत. त्यामुळे तिथुन येणाऱ्या आवाजाचा विशेष करून जास्त त्रास होतो.तरी आपणास विनंती आहे कि, आपण त्यांना सांगून आवाज संध्याकाळी ७ नंतर कमी करण्यास सांगावे. स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.




