अशा उपक्रमातून वाढदिवस साजरा होणे हे समाधानाचे : किशोर कांबळे

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने ‘द पूना स्कुल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या 75 अंध विद्यार्थिनींना भोजन कार्यक्रम आणि फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष किशोर भगत यांनी केले होते. सदर कार्यक्रमाला किशोर कांबळे आवर्जून उपस्थित होते. त्यांना या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता.या वेळी गिरिष गुरुणानी, गणेश बोडके, मधुकर भगत, राजेश शेरखाने, गोकुळ खवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी किशोर कांबळे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा उपक्रमातून वाढदिवस साजरा केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान मिळाले आहे. कायम समाज हिताचे काम करायचे ही पक्षाची शिकवण आंगी बाळगून पक्षाचे सर्व पदाधिकारी काम करत असतात याचा अभिमान वाटतो.






