पुणे शहर

लाल मातीत व्यायाम करताना पैलवान खाली कोसळला, पुण्यातील घटनेने कुस्ती विश्वात शोककळा

पुणे : व्यायाम करत असताना पैलवानाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पुण्यात घडली आहे. पैलवानाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्वप्नील पाडाळे असे 31 वर्षीय मयत पैलवानाचे नाव आहे. पुण्यातील मारुंजी येथील कुस्ताच्या तालमीत आज सकाली 7.30 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा नेहमीप्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना अचानक स्वप्नीलला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला.

स्वप्नीन अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमीतील इतर लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून, तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा.

Img 20230308 wa0000
Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये