पुणे शहर

चांदणी चौक परिसरात बस 15 फूट खाली कोसळून अपघात; 8 जण जखमी

पुणे : मुंबईतून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून कोसळून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहीती आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. ही बस शर्मा ट्रॅव्हल्सची होती.

बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस १५ ते २० फूट खाली कोसळली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बायपासवरून साधारण १५ फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. अपघातग्रस्त बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. या बस अपघातात आठ प्रवासी जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आलं.

Img 20221228 wa000128129390617609791042356
कणेरी मठात गाई मृत्युमुखी प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण माहिती (पहा व्हिडिओ)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये