पुणे शहर
वारजे माळवाडी दिसला बिबट्या : वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी

पुणे : आता शहराच्या उपनगरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे पुढे आले आहे. वारजे माळवाडी येथील न्यू अहिरे येथील एका सुरू असलेल्या बंधकामा जवळ बिबट्या दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
आज सकाळी आठ च्या सुमारास हा प्रकार समोर आला असून वन विभागाची रेस्क्यू टीम यांच्यासह वारजे पोलिस बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पोहचले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी मोठी जाळी लावण्यात आली होती मात्र बिबट्याने तेथून पळ काढला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी, पुण्यात कोंढवे धावडे येथील एका
सोसायटीच्या आवारात बिबट्या दिसल्याने गोंधळ उडाला होता. तोच बिबट्या वारजे माळवाडी पर्यंत पोहचल्याचे बोलले जात आहे.
(पहा व्हिडिओ)




