पुणे शहर

कोथरूड गावाचे ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा

पुणे: हनुमान जयंती मुहुर्तावर कोथरूड चे ग्राम दैवत श्री म्हातोबा देवाचा उत्सव व हनुमान जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरते देवस्थानाच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे यंदा ही कीर्तन महोत्सव चा ज्ञान व भक्तीसागराचा कोथरुड मधील नागरिकांनी आनंद घेतला.

संपूर्ण ९ दिवस साजरा होणाऱ्या उत्सवात संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत किर्तन सेवा आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आले.आळंदी येथून आलेले वारकरी यात सहभागी झाले. ९ दिवस कीर्तन सेवा  ८ व्या दिवशी काल्याचे कीर्तन सप्ताहाची सांगता करण्यात आली.९ व्या दिवशी हनुमान जन्मोत्सव व श्री म्हातोबा देवाची यात्रा असे नियोजन असते. 

Img 20221126 wa02126927299965323449855 1

यंदा कोथरूडचे ग्रामस्थ आणि मुळ रहिवाशी युवकांनी कोथरूड युवा मंचची स्थापना केली, या माध्यमातून गावातील युवकांचे एकीकरण करण्यात आले आणि आपले सण – उत्सव जल्लोषात साजरा करायचे एवढाच उद्देश घेऊन युवा पिढी एकत्र आली.
आजकालच्या फास्ट फॉरवर्ड लाईफ स्टाईल ला छेद देऊन एक भक्ती आणि आनंद उत्सव डी.जे. ला डावलून, विरोध करून पारंपरिक ढोल ताशा झांज पथक आमंत्रित केले गेले.

युवापिढी ने व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली. येणाऱ्या काळात उत्सवाचे स्वरूप आणखी भव्य आणि जनहित, समाजसेवा, समाजप्रबोधन, एक वेगळाच आदर्श निर्माण करण्याची ईच्छा  समस्त ग्रामस्थांनी श्री म्हातोबा चरणी प्रार्थना केली .

मुळीक परिवाराचा पोषाखाचा मान, कोथरूड गावात मंदीरात आणि म्हातोबा टेकडीवर कालाष्टमी दिवशी होणारा जन्मोत्सव,  एरंडवणा भागातून खिलारे परिवाराची मानाची काळभैरवनाथाची काठी, तसेच सुतार श्री वाढेश्वराची मानाची काठी ग्रामदेवतेच्या भेटीस येते, भेलकेंचा मान असलेली ग्रामदैवत म्हातोबाची पालखी  मंदिरातून निघून माळवाडी (शास्त्रीनगर) येथे येती त्यानंतर आझादवाडी, येथून कोथरूड गावठाण नगर प्रदक्षिणा झाल्यावर मंदीरात पालखी विसावते.त्यानंतर पारंपारिक ढोल लेझीम पथक निमंत्रित करण्यात आले . त्यांचे खेळ मंदिरासमोर प्रदक्षिणा मार्गावर करण्यात आले. अतिशय उत्साहात, आनंदात उत्सव पार पडला.

Screenshot 2023 03 21 09 34 12 55

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये