कोथरुड

२४ तासात ओल्या कचऱ्या पासून ऑरगॅनिक खत निर्मिती ; कोथरूड मध्ये याठिकाणी सुरू आहे प्रात्यक्षिक

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचा पुढाकार

कोथरूड : ऑरगॅनिक सेमी कंपोस्ट यंत्राद्वारे अवघ्या २४ तासात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक कोथरूड मधील डहाणूकर कॉलनी येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानात दाखवण्यात येत आहे. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३” अन्वये तसेच “७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनाचे” औचित्त्य साधून कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी, जनवाणी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नीट वाईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या वतीने ऑरगॅनिक सेमी कंपोस्ट यंत्राद्वारे अवघ्या २४ तासात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात येत आहे.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे पराग कुलकर्णी, गौतम दातार, बळी काका, पोतनीस काका, साळू काका, क्रियाशील जनसेवक बाळू दांडेकर यांच्या हस्ते यंत्र चालू करण्यात आले. ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्टर हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार खत तयार करण्याचे आधुनिक यंत्र “निट वाईड इंडस्ट्रीज लिमिटेड” कंपनीने विकसीत केले आहे.

हे प्रात्यक्षिक कार्यक्रम ७ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत डहाणूकर कॉलनी येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान याठिकाणी सकाळी ७ ते ११ व दुपारी ४ ते ६ या वेळेत राहणार आहे तरी कोथरूड भागातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

हे यंत्र खरेदी करण्यासाठी प्रशासनाने व लोक प्रतिनिधीने सोसायट्यांना काही प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशा सुचना देखील काही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केल्या. सदर कार्यकमाचे उद्घाटन प्रसंगी काही नागरिकांनी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली भागात तत्परतेने, कर्तव्यनिष्ठेने काम पहाणारे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, प्रशांत दामले यांच्या उत्कृष्ट नियोजन व नागरिकांशी जनसंपर्क व सुसंवाद साधून स्वच्छतेविषयीचे विविध जनजागृतीपर उपक्रम राबववत असतात,तसेच स्वच्छतादूत व कर्तव्यनिष्ठ आणि कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे ब्रॅंड अँम्बॅसिडर वैजीनाथ गायकवाड व त्यांचे सहकारी मोकादम आण्णा ढावरे आणि भल्या पहाटे येऊन रस्ते स्वच्छतेचे कामे करणारे सर्व सफाई सेवकांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये