पुणे शहर

पुणेकरांच्या आरोग्य योजना महापालिकेने पुन्हा सुरु कराव्यात मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील पुणेकरांसाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा करा, अशी मागणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

मोहोळ म्हणाले, योजना पुनर्रचनेसह पुन्हा सुरु करण्याची मागणी केली असून स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे असताना या योजना कार्यान्वित केल्या होत्या आणि सलग पाच वर्षे सुरुही ठेवल्या. मात्र प्रशासक म्हणून अंदाजपत्रक मांडताना या योजनांना तरतूद न दिल्याने योजना बंद आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले आहे.या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक असून प्रशासनाने या योजनांचा तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. या योजना पुणेकरांसाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे यावर लवकरच घेण्यात यावा.

Screenshot 2023 0427 133512172213840565051751

याशिवाय रजामुदतीच्या एकूण ९३ शिक्षकांना सेवेत कायम करणे आणि १५२ समूह संघटक आणि संघटिका यांना सेवेत कायम करणे, याही मागण्या आयुक्तांकडे केल्या आहेत. शिवाय मा. नगरसेविका रुपालीताई धाडवे या पाठपुरावा करत असलेल्या बिबवेवाडी-धनकवडी पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेल्या जवळपास ८ हजार निवासी आणि बिगरनिवासी गाळे हस्तांतरण प्रक्रियेची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

चांदणी चौकातील जिजाऊ मॅांसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य शिल्प साकारण्यात येणार असून या शिल्पाची निविदा प्रक्रिया लवकर करावी, अशीही मागणी आयुक्तांकडे केली आहे. अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये