पुणे शहर

पुण्यात पुढील चार- पाच दिवस उष्णतेची लाट सदृष्य परिस्थिती; हवामान विभागाची माहिती, काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पुढील चार ते पाच दिवस शहरात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती जाणवेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

या सोबतच जूनमध्ये शहरात बहुधा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

पुण्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले आहे. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी बाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, गरज नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. गुरुवारी पुण्याचे तापमान हे ४१ अंश सेल्सिअस होते. पुणे शहरात देखील अनेक भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोरेगाव पार्क, तळेगाव ढमढेरे, वडगाव शेरी, मगरपट्टा या भागात ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार-पाच दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

या संदर्भात माहिती देतांना पुणे हवामान आणि अंदाज विभागाच्यावतीने माहिती देण्यात आली आहे की, “सध्या राज्यात कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नाही, प्रामुख्याने शहराचे हवामान स्वच्छ आहे. दरम्यान, पुण्यातील तापमान पुढील ४-५ दिवस वाढणार असून या काळात जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये