पुणे शहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने देशाला दिशा देण्याचे काम केले : सुप्रिया सुळे

वारजे येथे व्याख्यानमालेचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

वारजे : छत्रपतींच्या इतिहासाचा केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अभिमान आहे. महाराजांच्या इतिहासाने देशाला दिशा देण्याचे काम केलं. महाराजांचा रयतेच्या राज्यात सर्व धर्माचे लोक समान होते असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत वारजे साहित्यिक कट्ट्याच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय व्याख्यान मालेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ उपस्थित होते.

सुळे पुढे म्हणाल्या खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून वक्ते करतील. या ठिकाणी गड किल्ल्यांचे फोटो आणि माहिती लावलेली आहे. यातील जास्तीत जास्त किल्ले हे बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. जवळपास हे सगळे किल्ले मी चढले आहे आणि त्यातील बारकावे, त्याचा इतिहास जवळून पाहण्याची संधी मला मिळाली.

संतांनी जे शिकवले त्याला शास्त्रीय आधार आहे परंतु अंधश्रद्धेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. आता मोबाईल आणि गुगलच्या युगात समाजात अंधश्रद्धा वाढताना दिसत असल्याने त्याची काळजी वाटते. या उलट मोबाईल येण्याअगोदरची पिढी त्यांच्याकडे मोबाईल व गुगल नसतानाही जास्त पुरोगामी होती त्यांनी अंधश्रद्धा कमी करण्यावर भर दिला पण आता मात्र उलट होताना दिसत आहे आणि हे घातक आहे. साडी घातली म्हणून तुम्ही मागासलेले होत नाही आणि जीन्स घालून तुम्ही अंधश्रद्धा वर विश्वास ठेवला तर तुम्ही पुढारलेले होत नाही. व्यापक विचार या व्यासपीठावरून व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एका चांगल्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सुळे यांनी दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांचे आभार मानले.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

वारजे येथील नादब्रह्म सोसायटी जवळील मैदानावर सहा जून पर्यंत ही व्याख्यानमाला सुरू राहणार असून रोज सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानाची सुरुवात होणार आहे. या व्याख्यानमालेत शनिवार व रविवार रोजी स्वराज्याची पार्श्वभूमी या विषयावर हिमांशु डबीर यांचे व ह भ प धर्मराज महाराज हांडे यांचे मावळ्यांचे स्वराज्यासाठी मोलाचे योगदान या विषयावर व्याख्याने झाली.

सोमवार दिनांक 5 जून रोजी इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तुत्व आणि आजचे वास्तव या विषयावर अर्चना करंडे यांचे व्याख्यान होणार आहे तर मंगळवार 6 जून रोजी शिवबा ते छत्रपती शिवराय या विषयावर राकेश पिंजण सरकार यांचे व्याख्यान पार पडणार आहे.

Fb img 1685940661900

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यातील बारकावे नवीन पिढीला कळावे म्हणून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून पालकांनी आपल्या मुलांसह व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांनी केले आहे.

Fb img 16837376233493064729888638918603
Img 20230604 170458573061240271081065

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये