महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला विलिगिकरण केले आहे.

त्यांनी म्हंटले आहे की,  काल मला अशक्तपणा जाणवत असल्याने माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला.  माझ्या तपासणी दरम्यान कोवीड चाचणी घेण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे पण सर्वांच्या आशीर्वादाने माझी तब्येत ठीक आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने सावधगिरी बाळगून प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये