डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती आदर आणि आभार व्यक्त ; सचिन दांगट यांचा उपक्रम

वारजे : १ जुलै रोजी डॅाक्टर डे औचित्य साधुन भाजप सहकार आघाडीचे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्या वतीने वारजे परिसरातील हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा व वारजे कोथरूड आणि पुणे डॅाक्टर असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी असलेले ५० डॅाक्टरांचा एक रोपटे , सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यंदा या उपक्रमाचे ९ वे वर्षे असून दरवर्षी न चुकता या उपक्रमाचे आयोजन करत सचिन दांगट आपल्या सहकाऱ्यांना घेऊन डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती आदर आणि आभार व्यक्त करत असतात.
यावर्षी माई मंगेशकर हॅास्पिटल, बोरीकर हॅास्पीटल, चैतन्य हॅास्पीटल , कवडे हॅास्पीटल , साई क्लिनीक , शहा क्लिनीक , शुभदा क्लिनीक, बर्वे क्लिनीक , शिंदे क्लिनिक यांचेसहित वारजे , कोथरूड आणि पुणे डॅाक्टर असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी असलेले ५० डॅाक्टरांचा एक रोपटे , सन्मानपत्र देऊन सन्मान करुन त्यांच्या सेवेप्रती आदर आणि आभार व्यक्त करण्यात आले .
फक्त निवडणुकीच्या तोंडावर आठवण न काढता दरवर्षी न चुकता सन्मान करीत असल्याने अनेक मान्यवर डॅाक्टरांनी या ऊपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. यावेळी भाजप सहकार आघाडीचे खजिनदार सुभाष आगरवाल , कविवर्य राजेंद्र वाघ , मनिषा सचिन दांगट , रेश्मा पाटणकर , रंजना वाघ , व्यंकटेश दांगट, यांचेसह अनेक मान्यवर डॅाक्टर उपस्थित होते .



















