पुणे शहर

लायगुडे हॉस्पीटल मध्ये होणार ऑक्सीजन बेडची सोय

लायगुडे मधील बंद केलेले स्वॅब टेस्ट सेंटर सुरू

पुणे :  सिंहगड रोडवरील पुणे महानगरपालिकेच्या लायगुडे हॉस्पीटल मधील बंद करण्यात आलेले कोरोना स्वॅब टेस्ट सेंटर आखेर सुरू करण्यात आले आहे. याबाबत विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. 

धुमाळ यांनी सांगितले की लायगुडे हॉस्पीटल मधील बंद स्वॅब टेस्ट सेंटर आता सुरू करण्यात आले आसून आता लवकरच या हॉस्पीटल मध्ये साधारण ५० ऑक्सीजन बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया ही आता सुरू झाली आहे.  

सिंहगड रस्त्यावर लोकमत कार्यालयाजवळ पुणे मनपाचे प्रशस्त व भव्य इमारती मध्ये लायगुडे हॉस्पीटल आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्या ठिकाणी या परिसरातील नागरिकांसाठी कोरोना स्वॅब टेस्ट सुरू करण्यात आले होते मात्र काही दिवसांपूर्वी ते आचानक बंद करण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना पु. ल. देशपांडे उद्यानात स्वॅब टेस्ट साठी जावे लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे धुमाळ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.   

हा परिसर शहरालगत असल्याने येथील लोकसंख्या मोठी आहे.  या हॉस्पीटलमध्ये रुग्णांसाठी कोरोना साठी आवश्यक असणारे ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स व आवश्यक असणारी सुविधा सुरू करण्यासाठी धुमाळ यांनी  पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले असून या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये