संभाजी भिडेंविरोधात दीपक मानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात जोरदार निदर्शने

पुणे : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी , महात्मा जोतिराव फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व समाजसुधारक यांच्याबाबतीत केलेल्या गैरवक्तव्यांचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करुन निषेध करण्यात आला. भिडे यांना या अवमानकारक वक्तव्याबद्दल अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी हे शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी लढले या राष्ट्रपित्याचा अपमान आपण कोणीही सहन करू शकत नाही, संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर भिडे हे असून ही व्यक्ती संभाजी हे नाव लावून जनतेची का फसवणूक करते याचा शोध धेणे निश्चितच गरजेचे आहे, या व्यक्तीला त्वरीत अटक व्हावी याकरीता आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत. भिडेंना त्वरीत अटक न झाल्यास आम्ही या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत, असे मानकर यांनी सांगितले.

शहराघ्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,बाबा धुमाळ, हर्षवर्धन मानकर, रूपाली ठोंबरे, पुजा झोळे,बाळासाहेब बोडके, प्रिया गदादे, विनोद ओरसे, संतोष नांगरे, अब्दुल सत्तार, विनोद पवार, शिवाजी पाडाळे,संतोष बेन्द्रे, सोनाली गाढे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









