किरण दादांमुळे स्वप्नवत वाटणारी काशी यात्रा पूर्ण झाली.. ज्येष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू

किरण दगडे पाटील यांच्यावतीने आयोजित काशी यात्रेची खडकी रेल्वे स्थानक येथे उत्साहात सांगता..
पुणे : भोर विधानसभा मतदारसंघाच्या भोर- मुळशी- वेल्हा तालुक्यातील व बावधन भुसारी कॉलनी येथील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत महातीर्थ काशी विश्वनाथ दर्शन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील 3000 भाविक काशी विश्वनाथांचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात भक्तीभावाने घरी परतले. खडकी येथे रेल्वे स्टेशनवर यात्रेकरुंचे आगमन झाले आणि फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
खडकी रेल्वे स्टेशनवर नगरसेवक किरण दगडे पाटील तसेच यात्रेतील नागरिकांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक व मित्र मंडळींनी यात्रेकरूंचे गळ्यात पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. एवढया मोठया संख्येने नागरिकांना काशीला घेऊन जाणे, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू न देणे, प्रवासात सर्वांची आपुलकीने काळजी घेणे व सर्वांना सुखरूप घरी आणेपर्यंत किरण दगडे पाटील आणि संपूर्ण टीमने घेतलेल्या कष्टाचे कौतुक करताना यात्रेकरूंच्या भावना दाटून आल्या.
किरण दादांनी काशी यात्रा आयोजित केली म्हणून आम्ही काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊ शकलो अशी भावना काहींनी व्यक्त केली तर घरच्या लोकांसारखी काळजी आणि स्वप्नवत वाटलेली यात्रा सफल झाल्याने ज्येष्ठांच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते. काहींना तर आपल्या भावना व्यक्त करता आल्याच नाहीत. कोणी किरण दगडे यांच्या गळ्यात हार घालत होते, कोणी हारबुके देत होते, कोणी त्यांचे हात हातात घेऊन डोक्याला लावत होते आणि आभार मानत होते. किरण दगडे ही नागरिकांचे प्रेम पाहून भारावून गेले होते. हे सगळे होत असतानाच या यात्रेत अनेक अनोळखी व्यक्ती ओळखीच्या झाल्या. अनेकांचे मैत्रीचे ऋणानुबंध तयार झाले होते. यात्रा संपली आणि परत नक्की भेटू असं म्हणत त्यांनी एकमेकांचे आस्थेने निरोप घेतले. असं सगळं चित्र खडकी रेल्वे स्टेशनवर यात्रा संपल्यानंतर पहायला मिळाले.







दिलेला शब्द पूर्ण करत समस्त नागरिक, माता-भगिनींना हिंदूंचे प्रार्थनीय तीर्थस्थळ काशी विश्वनाथांचे दर्शन घडविता आले, तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून काशी तीर्थस्थळाचा झालेला विकासरुपी कायापालट बघण्याचे सौभाग्य सर्वांना मिळाले या गोष्टीचे समाधान वाटत असल्याची भावना माजी नगरसेवक व भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांनी व्यक्त केले.


















