महाराष्ट्र

पुणे बंगळुरू महामार्गावर गाडीचा टायर फुटून अपघात; तीन ठार, चार जखमी

पुणे : मुंबईहून जयसिंगपूरला जाणाऱ्या गाडीचा टायर फुटून उभ्या असणाऱ्या दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळून झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार, तर चारजण जखमी झाले. पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत ही घटना घडली आहे. जखमींना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये एक महिला अत्यवस्थ आहे. निखिल शशिकांत चौखंडे (वय ३० वर्ष), प्रियांका निखिल चौखंडे (वय ३२ वर्ष), शशिकांत यदुनाथ चौखंडे (वय ६३ वर्ष) , अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत.

पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवी मुंबई येथून जयसिंगपूरकडे निघालेल्या तवेरा गाडीचा टायर साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असणाऱ्या कणसे हुंडाई शोरूमजवळ अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून समोर कोल्हापूरकडे निघालेल्या बोलेरो पिकअप टेम्पोला तवेराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की या गाडीत प्रवास करणाऱ्या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये