पुणे शहर

कोथरूड भाजप सरचिटणीस विठ्ठल बराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

कोथरूड : कोथरूड मतदार संघाचे भाजप सरचिटणीस विठ्ठल बराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी कोथरूड, कर्वेनगर वारजे परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत त्यांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळ चौकात रक्तदान शिबिर, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे व मित्रपरिवार, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबिरामध्ये १०३ रक्त बाटली संकलन करण्यात आले. नेत्र तपासणी शिबिरात १६३ लोकांची डोळे तपासणी करण्यात आली, यामध्ये २० लोकांचे मोतिबिंदू ऑपरेशन करण्यात येणार असून असून ३ लोकांची डोळ्यावरची वाढलेली कातडी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात येणार आहे.

Img 20230905 wa00008380118701829157868
Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये