पुण्यात कुटुंबासह गणपती पहायला जाताय.. मग पुणे पोलिसांची हि सुविधा नक्की वापरा; पुणे पोलीस सारथी गणेश उत्सव गाईड सुविधा

पुणे : पुणे पोलिसांच्या उत्सव गणेशाचा सारथी गाईड सुविधेच्या लिंकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अनावरण झाले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रदीपकुमार मगर उपस्थित होते.
पुणे शहरातील गणेश मंडळांचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अनेक भाविक चारचाकी व दुचाकी आणतात. त्यासाठी २८ पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. या पार्किंगची माहिती सारथी गाईड क्यूआर कोड स्कॅन केल्यास तसेच लिंकवर क्लिक केल्यास मिळू शकणार आहे. याशिवाय १२ मानाच्या गणपती यांच्या दर्शनासाठी वाहतूक मार्गाची माहिती व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. बंद रस्ते, उपलब्ध मार्ग यांची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासह वाहतूक जलद होण्यात मदत होणार आहे.

सिंहासन News च्या बातम्या, अपडेट्स आता व्हॉट्सअप चॅनलवर. आजच फॉलो करा.खालील लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करुन अपडेटस् मिळवा…
Follow the सिंहासन News sinhasannews channel on WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va9p6qIBlHpiiqL83N0C


















