कर्वेनगरमधील विकास मित्रमंडळाने यंदा “बुलंद दरवाजा” हा जिवंत देखावा साकारला आहे; देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

पुणे : कर्वेनगर मधील विकास मित्रमंडळाचे यंदा 46 वे वर्ष असून यंदाच्या वर्षी मंडळाने “बुलंद दरवाजा” हा जिवंत देखावा सादर केला आहे. मुघलांशी झालेल्या तहा नुसार छत्रपति शिवाजी महाराज आग्र्याला जात असताना महाराजांनी सूचना केली. कोणत्याही गडाचे दरवाजे बंद झाले की ते सकाळीच उघडायचे यावेळी केवळ जिजाऊ आणि तीन अष्टप्रधान मंडळातील पंतप्रधान यांचा शिक्का असल्या शिवाय दरवाजे उघडले जाऊ नयेत. मी स्वतः आलो तरी दरवाजे उघडले जाऊ नयेत. असे महाराजांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगावर मंडळाच्या वतीने जिवंत देखावा सादर केला आहे.
या गोष्टीची परिक्षा घेण्यासाठी शिवाजी महाराज स्वतः सिद्धगड ला जातात तिथे किल्लेदाराला सांगतात दरवाजा उघड मात्र किल्लेदार दरवाजा उघडत नाही महाराज त्याला सांगतात माझ्यामागे मोघल लागले आहेत मी संकटात आहे. दरवाजा उघड मला आत घे तरी देखील किल्लेदार दरवाजा उघडत नाही. तो किल्ल्यावरील बंदोबस्त चोख ठेवतो.
सकाळ झाल्यानंतर दरवाजा उघडतो. त्यावेळी तो किल्लेदार महाराजांची माफी मागुन मला काय शिक्षा द्यायची ती द्या असं म्हणतो. त्यावेळी महाराज त्याची पाठ थोपटत म्हणतात मी तुमची परिक्षा घेतली त्यात तूम्ही सूचनांचे आणि कायद्याचे पालन काटेकोर केले. अशा प्रकारे किल्ल्याचा दरवाजा बुलंद राहत असल्याचा जीवंत नाट्य प्रसंग मंडळाने साकारला आहे.
विकास मित्र मंडळाचे आधारस्तंभ राजाभाऊ बराटे, विजय पारगे, किरण अण्णा बराटे,अध्यक्ष विठ्ठल बराटे, उपाध्यक्ष गणेश थोरात, खजिनदार संग्राम दळवी, कार्याध्यक्ष अजय बराटे, सचिव अमोल नगरे,शुभम ढवळे, संघटक ललित नलावडे आहेत.



















