पुणे शहर

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक : माध्यम विभाग’ या पदावर अमोल कविटकर यांची नियुक्ती

पुणे : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक : माध्यम विभाग’ या पदावर अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आज या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते कविटकर यांना देण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, मुख्य प्रवक्ता नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर उपस्थित होते. कविटकर म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि समर्पित भावनेने करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. या पदाचं दायित्व सोपवल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे पुनःश्च एकदा धन्यवाद देत आभार मानतो.

Img 20260222 wa00063491038201882637992

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये