महाराष्ट्र

५ ऑक्टोबर पासून हॉटेल रेस्टॉरंट्स सुरु होणार

मुंबई : मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनलॉक ५ मध्ये राज्यात काय सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज राज्य सरकारने याबाबतच्या  गाईड लाईन जारी केल्या आहेत.  त्यानुसार अनलॉक ५ अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.  ५ ऑक्टोबरपासून ५०% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  हॉटेल सुरू करताना सामाजिक अंतर पाळणे, थर्मल स्क्रिनिंग, हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे असणार आहे.

या अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी दिली गेली आहे. तसेच
अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु होणार आहेत. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध राहणार नाहीत. तसेच महत्वाचे म्हणजे डबेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी दिली गेली आहे. पुणे विभागातील लोकल व ट्रेन सुरू होणार आहेत तर शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क हे बंदच राहणार आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये