पुणे शहर

पुण्यात मध्यरात्री मद्यधुंद कारचालकाकडून चार दुचाकींना धडक, एका युवतीचा मृत्यू

पुणे : मद्यधुंद कारचालकाने तीन ते चार वाहनांना धडक देऊन तरुणीला फरफटत नेल्याची घटना पुण्यात घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एक तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

सोनाली अविनाश रोकडे (वय 26) या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. खराडी येथील रिलायन्स मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघाताला कारणीभूत मद्यधुंद कारचालक भव्य अशोक नामदेव (वय 23, रा. केशवनगर मुंढवा पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर रोजी रात्री सोनाली ही तिचा मित्र अशोक गायकवाड यांच्यासोबत चहा पिण्यासाठी खराडी येथे थांबली. चहा पिऊन झाल्यावर ती आपल्या पीजीकडे चालली होती. त्याचवेळी खराडीकडून भरधाव वेगाने आलेल्या होंडा एकॉर्ड कार क्र.( MP 09/CB 4461) वरील चालकाने पाठीमागून येऊन तिच्या वाहनासह दोन-तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. सोनाली एक्टिवा दुचाकी क्रमांक (MH 12-QX 6009) वर पाठीमागे बसली होती. सोनाली या अपघातात गंभीर जखमी झाला. तिच्या सोबत असलेला वाहन चालवणारा युवकही या अपघातात जखमी झाला.

Img 20230717 wa0012281294586790481769091554

उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता सोनाली हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मद्यधुंद कारचालक वाहनांना धडक देत वाहनांच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेल्या अपघातावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिऊन सर्रास वाहन चालवून गंभीर अपघाताचे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत. मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाईची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी पोलिसांकडून मुख्य मार्गांवर व चौकांमध्ये वाहनचालकांची तपासणी केली जात होती मात्र सध्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमुळे नागरिकांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये