मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्याला साजेल असा मंदार बलकवडे यांचा सामाजिक उपक्रम

मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण..
कोथरूड : चंद्रकांत दादा कोथरूड मतदार संघात जेव्हापासून आमदार झाले. तेव्हापासून मतदार संघात विधायक कामाचा ओघ सुरू झाला. छोट्या मुलापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत लोककल्याणाच्या अनेक योजना, अनेक उपक्रम स्वतःच्या खर्चातून, प्रयत्नातून त्यांनी सुरू केले, आणि म्हणून मला अस वाटतं त्याच पद्धतीचा उपक्रम मंदारने दादांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रुग्णवाहिका सुरू करून केला आहे. या पेक्षा चांगल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादांना असू शकत नाहीत अशा भावना केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
देशप्रेमी मित्र मंडळ व फ्लाय हाय चॅरिटेबल सोसायटी यांच्या वतीने कै.अनिलभाऊ बलकवडे व कै.विजयदादा धापसे यांच्या स्मरणार्थ भाजप शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे यांच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या ॲम्ब्यूलन्सचा लोकार्पण व वही महोत्सवाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ७०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

पुढे बोलताना मोहोळ म्हणाले, गेले अनेक वर्ष या भागात मंदार बलकवडे सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत आहे. वडिलांच्या पावलावरती पाऊस ठेवून एक सामाजिक कार्याचा वारसा मंदार पुढे नेत आहे. गेली अनेक वर्षापासून देश प्रेमी मंडळ असेल किंवा राजकीय पक्षाच्या माध्यमातून मंदार नेहमीच लोकांच्या मदतीला उभा राहिला आहे. लोकांना अपेक्षित अशा पद्धतीच काम त्यानं त्याच्या प्रयत्नातून उभं केलं. सामाजिक बांधिलकीची जाणीव त्याच्या मनामध्ये डोक्यामध्ये असल्याचे तो करत असलेल्या कामातून दिसून येते.



चंद्रकांत दादांचा वाढदिवस आहे तर कुठला कार्यक्रम करायचा तर त्याने लोकांच्या हितासाठी लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्याने एक मोफत रुग्णवाहिका सुरू केली आहे. आपल्या आवडत्या माणसाचा वाढदिवस साजरा करताना घेत असलेल्या उपक्रमाला सामाजिक स्वरूपाची किनार आहे. भावना आहेत. आणि मंडळाच्या सभासदांच्या आठवणी सुद्धा जपायच्या…दादांच्या कार्यातून प्रेरित होऊनच त्यानं हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. दादांना आपल्या सर्वांच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मतदार संघात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आमचे काम सुरू आहे. मुलींच्या शिक्षणासाठी, गर्भवती महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. मंदारने आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेला उपक्रम लोकांच्या गरजेचा आहे. सामाजिक जाणिवेतून त्याने हा उपक्रम सुरू केला आहे.
पाटील म्हणाले “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईलच पण ती आमच्या टर्म वर होईल. मी आणि मुरलीधर मोहोळ पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी एकत्रित पाहतोय. आम्ही दोघेही नम्रतेने वागणाऱ्यांशी नम्र आणि दादागिरी करणाऱ्याशी दादागिरी” करू असा थेट इशारा इतर राजकीय पक्षांना पाटील दिला आहे.
यावेळी श्रीमती रूपाली बलकवडे, श्रीमती विद्या धापसे, ब्रिलियंट पब्लिकेशनच्या संचालिका सुवर्णा बोरचाटे, संगीतकार पियूष कुलकर्णी, माजी रणजीपट्टू विनायक द्रविड, नंदकुमार बालवडकर, डॉ.रमाकांत कुलकर्णी, माजी नगरसेवक विशाल धनवडे, कोथरूड मंडल अध्यक्ष कुलदिप सावळेकर, मंगेश खराटे , गजानन माझिरे, राजेंद्र,प्रशांत हरसुले, अमोल डांगे, शंतनू खिलारे, वैभव जमदाडे, जनार्दन क्षीरसागर, श्रीकांत गावडे, अभिजीत मारणे, गणेश शिंदे, अजय मारणे, नवनाथ जाधव, प्राची बगाटे, गायत्री लांडे, अपर्णा लोणारे, अनघा जगताप, देशप्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गणेश नगर एरंडवणे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






