कोथरुडचे ग्राम दैवत म्हातोबाला सुनील देवधर यांनी दिले अयोध्येतील राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेचे आमंत्रण

कोथरुड नगर अभियानास सुरुवात.
पुणे: कोथरुडचे ग्राम दैवत म्हातोबाला सुनील देवधर यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या भव्य राममंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेचे आमंत्रण देऊन कोथरुड नगर अभियानास केली सुरुवात.
दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी कोथरूड नगरातील म्हातोबा मंदिर, कोथरूड गावठाण येथे सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत श्रीराम मंदिर अक्षता निमंत्रण अभियान निमित्त महाआरती आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्याने झाली, त्यानंतर रोहित फडणीस, कोथरूड नगर अभियान प्रमुख यांनी या संपूर्ण अभियानाची माहिती प्रास्ताविकात दिली.

यानंतर नवचैतन्य हास्य परिवार मधील सदस्यांनी राम गीत सादर केले.सामूहिक रामरक्षा पठण आणि वक्ते श्री. मोहन जी शेटे यांनी उपस्थित सर्व राम सेवकांना मार्गदर्शन केले .
केशव शंखनाद पथक, पुणे संस्थापक आणि अध्यक्ष नितीन जी महाजन यांनी पथकाविषयी आणि आगामी उपक्रमा विषयी माहिती दिली.केशव शंखनाद पथकाला २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त शंख वादन करण्यासाठी १११ जणांना राम मंदिर न्यास ट्रस्ट तर्फे निमंत्रित केले आहे. यानंतर पथकाचे काही प्रयोगांचे वादन झाले.



सुनील जोशी, कोथरूड नगर कार्यवाह यांनी आभार प्रदर्शन केले आणि महाआरती होऊन संपूर्ण मंगलमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.सुनील देवधर यांनी कोथरूड चे ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात अक्षता आणि पत्रक ठेवून कोथरूड गावठाण वस्ती ची संपर्क अभियानाची सुरुवात केली आणि उपस्थित सर्व राम सेवकांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अनिरुद्ध देशपांडे, अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य, रविंद्र लाटे, भाग कार्यवाह, बिपिन पाटसकर, मा. संघचालक कोथरूड नगर, गजानन भेलके, अध्यक्ष, म्हातोबा मंदिर ट्रस्ट, कोथरूड,रणजित हगवणे, पुणे शहर युवा अध्यक्ष, भारतीय किसान संघ.या कार्यक्रमात एकूण ३५० उपस्थिती होती.






