पुणे शहर
शिवसेनेच्या कांचन कुंबरे यांचा भाजपात प्रवेश

पुणे : शिवसेनेच्या कोथरूड विधानसभा संघटिका कांचन कुंबरे यांनी शिवसेनेला रामराम करीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पाटील यांनी कुंबरे यांची भाजप पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस पदी नियुक्ती केली.

यावेळी खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
यावेळी कुंबरे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरविन. पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.



