राम भक्तांकडून प्रभात रस्ता,भांडारकर रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता या भागात शोभायात्रा; गणेशोत्सव मंडळ आणि व्यापारी संघटनांकडून स्वागत

पुणे : 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.त्याच्या तयारी करिता भागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावं यासाठी राम भक्तांकडून प्रभात रोड भांडारकर रोड एफसी रोड भागात शोभा यात्रा काढण्यात आली. शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सर्वजण मंगलवेश तसेच पारंपारिक वेशामध्ये सहभागी झाले.

रॅली सायंकाळी ५:३० वाजता पांचाळेश्वर मंदिरामधून चालू होऊन फर्ग्युसन रोड, बीएमसीसी रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, मार्गे कमला नेहरू पार्क येथील दत्त मंदिरामध्ये येऊन त्या ठिकाणी सामुदायिक रामरक्षा पठण होऊन कार्यक्रमाची समाप्ती झाली.
यामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष युवा रामभक्तांनी सहभाग घेतला.
या रॅली साठी श्री गुरुदेवदत्त मंदिर ट्रस्ट कमला नेहरू पार्क एरंडवणा, प्रभात तरुण मंडळ, साने डेरी चौकातील विनायक नवयुग मित्र मंडळ गोखले स्मारक चौक मित्र मंडळ श्रीकृष्ण मित्र मंडळ सुदर्शन मित्र मंडळ आणि एफसी रोड व्यापारी संघटना यांनी केलेलं स्वागत यामुळे रॅलीला खूप छान रूप आलं.







































