रामलल्लाच्या स्वागतासाठी शिवसंग्राम संघटनेकडून पुण्यात लाडू वाटप..

पुणे : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेच्या वतीने रामलल्लाचे स्वागत राज्यातील प्रत्येक जिल्हयात लाडूचा प्रसाद वाटप करून करण्यात येणार आहे. राज्यात १००० किलो लाडूच्या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
आज पुणे शहर शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तुळशी बाग येथील श्रीराम मंदिरात लाडूप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड,
महिला अध्यक्षा कालिंदी गोडांबे, चेतन भालेकर सामाजिक न्याय अध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष भरत फाटक, संतोष वरक, सोशल मीडिया प्रमुख लहू ओहोळ, खड़कवासला अध्यक्ष सागर फाटक, कुंभार समाज पुणे जिल्हा सरचिटणीस सविता कुंभार, शिवाजीनगर संघ अध्यक्षा योगिनी परदेशी आदी उपस्थित होते.

भरत लगड म्हणाले, उद्या अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार होत आहे. शिवसंग्राम संघटना हा आनंदोत्सव प्रत्येक जिल्ह्यात उत्साहात साजरा करणार आहे. प्रत्येक ठिकाणी लाडू वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.










































