पुणे शहर

महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यावे तरच त्यांचे जीवन समृद्ध बनेल -अमृता फडणवीस

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत नमो वॉकेथॉन चे आयोजन

पुणे : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत नमो वॉकेथॉन चे आयोजन केले होते त्याप्रसंगी अमृता फडणवीस यांनी असे प्रतिपादन केले की महिला शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर मी पहिल्यांदाच बघत आहे आपण महिला सर्वच आघाड्यांवर लढत असतो आपणच स्वतःची काळजी घेतली तरच आपले जीवन समृद्ध सशक्त बनेल भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे मी विशेष कौतुक करते की असा उपक्रम राबवून त्यांनी महिलांच्या मागे भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे हे दाखवून दिले. पुढे बोलताना सौ फडणवीस म्हणाल्या उद्या श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त देशात सगळीकडे भगवे वातावरण निर्माण झालेले आहे ही येणाऱ्या हिंदू राष्ट्राची नांदीच आहे.

Img 20240121 wa00382598004317740425806


राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच श्रीराम मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे अचूक वेळी घेतलेले योग्य निर्णय यामुळे हे शक्य झाले आहे . शहरांमध्ये तसेच देशांमध्ये सर्व वातावरण राममय झालेले आहे ५२८ वर्षाच्या संघर्षानंतर हा विजय उत्सव संपूर्ण देश साजरा करत आहे. नमो वॉकेथॉन माध्यमातून महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण आदी विषयामध्ये महिला आघाडीचे काम खरंच कौतुकास्पद आहे प्रत्येक आठवड्यात महिलांसाठी अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना प्रेरणा व स्फूर्ती देण्याचे काम आपण केले पाहिजे.

Fb img 17058117418324121437191700473490


शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की नमो चषकाच्या अंतर्गत पुणे शहरात अत्यंत उत्साहात प्रतिसाद मिळत आहे आजचे नमो व्याकेथॉन हे त्याचेच प्रतीक आहे या नमो वॉकेथॉन चेसंयोजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, संयोजिका प्रियांका शेंडगे शिंदे ,गायत्री खडके, भावना शेळके, आरती कोंढरे, खुशी लाटे, सरचिटणीस कोमल कुटे, उज्वला गौड यांनी केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सौ अमृता फडणवीस, आमदार माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, अंकिता पाटील आदी उपस्थित होते.

Img 20240121 wa00112357920439439015160


श्रीराम मंदिर लोकर्पणा निमित्त स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गाणे लिहिलेले असून त्याला अजय -अतुल यांनी संगीत दिलेले आहे तसेच त्यातली काही कडवी ही अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांनी गायलेली आहेत अशी माहिती सौ अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले

Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20240121 wa00095487398556080398780
Img 20240121 wa00065252206207234881050
Img 20230511 wa0002282292969174931887579613
Img 20240120 wa00572661306229998441106
Img 20240120 1411245335154334332732265
Fb img 17058116689734456722729440444596
Img 20240120 wa00096813043095854158068

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये