पुणे शहर
हनुमाननगरमध्ये विठ्ठल मंदिरात दीपोत्सव आणि प्रभू श्रीरामाच्या आरतीने सोहळा संपन्न

पुणे : प्रभूश्रीराम यांचा अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमीत्ताने श्री विठ्ठल रुख्मिणी सेवा मंडळ (ट्रस्ट)येथे कीर्तनसेवा हभप बाळकृष्ण महाराज गोगावले{भोर} महिला भगिनींच्या वतीने मंदिरामध्ये दीपोत्सव, प्रभुश्रीराम आरती आणि कारसेवक आशितोष जोशी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी परिसरातील रामभक्त नागरिक सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजनश्री विठ्ठल-रुख्मिणी सेवामंडळ (ट्रस्ट), अजय मारणे यांनी केले होते.
अजय मारणे म्हणाले, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्येत उभे राहिले आहे. या निमित्ताने या परिसरातील नागरिकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन आनंदोत्सव साजरा केला.










