भोर विधानसभा नमो चषकाची जोरदार सुरुवात ; अमृता फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ

किरण दगडे पाटील यांच्या वतीने नमो चषकाचे आयोजन
पुणे : विविध क्रीडा प्रकार व कला प्रकारांचा समावेश असणाऱ्या भोर विधानसभा नमो चषकाचा शुभारंभ अमृता फडणवीस आणि पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या वतीने या नमो चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. A strong start to the Bhor Vidhan Sabha Namo Cup; The tournament was inaugurated by Amrita Fadnavis

या नमो चषकात क्रिकेट , फुटबॉल, खोखो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, बॅडमिंटन, धावणे १०० मीटर/४०० मीटर (ॲथलेटिक्स) तसेच सांस्कृतिक महोत्सवात चित्रकला, रांगोळी, गीत गायन, नृत्य , एकांकिका, वक्तृत्व अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.



नमो चषक अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू सहभागी होणार असून खेळात विशेष प्रविण्य मिळवून विजयी होणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजक किरण दगडे पाटील यांनी सांगीतले.
भोर विधानसभा नमो चषक शुभारंभ कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर खेळात नावाजलेल्या देविका पळशीकर – क्रिकेट, निव कोठारी – टेनिस, सिद्धांत कांबळे – स्केटिंग , ओंकार दगडे – रायफल /पिस्तूल इव्हेंट्स ग्रुप बी , ऐश्वर्या भोंडे – फुटबॉल, अर्णव पापरकर – टेनिस, सानिया कंधारे – कबड्डी, ठाकरे – (पीक बॉल गेम्स) योशिरो सरकार – स्केटबोर्डिंग यांना नमो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.









