आरोग्य

रमजान..खजूर आणि आरोग्य : डॉ.सचिन‌ नागापूरकर

रमजान महिना हा मुस्लिम समाजातील अंत्यंत पवित्र महिना. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असतो. रमजान महिन्याचे तीन हिस्से असतात. रमजान महिन्याचा पहिला दशक ‘कृपेचा’, दुसरा दशक ‘क्षमेचा’, तिसरा आणि अंतिम दशक नरकापासून ‘मुक्ततेचा’ मानला जातो. या काळात अल्लाह त्यास क्षमादान देईल व नरकापासून सुटका करून मुक्ती देईल.

मुस्लिम समाजातील अंत्यंत पवित्र मानला जाणारा हा महिना.‌ उपवास रोजा ठेवण्याचा महिना. मुस्लिम समाजात ह्या मुलभूत पाच कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिले इमान (प्रामाणिकपणा) दुसरे नमाज, तिसरे रोजा, चौथे हज आणि पाचवे जकात.. रमजान महिन्यात रोजा  महत्वाचा मानला जातो. रोजा उपवास सुरू करताना सुर्योदयापुर्वीचे जेवण म्हणजे सहेरी..आणि‌ सुर्यास्तानंतरचे जेवण म्हणजे इफ्तार आणि ह्या दोन्ही वेळा आहारातील प्रमुख पदार्थ म्हणजे खजूर.

Img 20240322 wa00017404573101520546217

खजूर ह्या खाद्यपदार्थाला मुस्लिम समाजातील अंत्यंत पवित्र पदार्थ म्हणून मानले जाते. मोहम्मद पैगंबर यांचे आवडते फळ म्हणून पण खजूर कडे बघितले जाते. जगभरातील मुस्लिम बांधव खजूर चे सेवन ह्या रमजान ईद रोजा उपवास दरम्यान करतातच. अतिशय शक्तिवर्धक असे हे फळ आहे. कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, कॉपर ने भरपूर असे हे फळ खजूर आरोग्यासाठी लाभदायक आहे. चांगल्या साखरेचे प्रमाण खजूर मध्ये असते, त्यामुळे दिवसभर उपवास असताना देखील शक्ती उर्जा निर्माण करण्याचे कार्य खजूर खाल्ल्यामुळे होते.

रोजा उपवास दरम्यान पाणी पिणं पण बंद असतं. खजूराचे सेवन केल्यास तहान लागणं कमी होते. भारतात बारा महिने खजूर उपलब्ध आहे. लाल आणि काळे खजूर. ह्या सह जगभरात पन्नास प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. बाजारात अजवा, मगजोल, बुमेन, फर्द, किमिया, फरत, सुलतान, बुरारी, कलमी, मदिना, रुकसार, हसना, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन या प्रकारचे खजूर मिळतात.

खजूरमध्ये फायबर चे प्रमाण भरपूर असल्याने अन्न पचन पण व्यवस्थित होते.असे हे आरोग्यदायी फळ रमजान महिन्यात आपल्या मुस्लिम बांधवांप्रमाणे सर्वांनी खाल्ले तर निश्चितच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये