पुणे शहर

मी महायुतीची म्हणजे मोदींची उमेदवार – सुनेत्रा पवार

बारामतीतील निवडणूक सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे – दीपक मानकर 

पुणे : महायुतीचा उमेदवार म्हणजे नरेंद्र मोदींचा उमेदवार म्हणून मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. आपण मला काम करण्याची संधी दिल्यास मी बावधनकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहील, असे मत बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सूनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केले. 

बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी विधानसभेतील बावधन येथील सोसायट्यांमधील मतदारांशी सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, शिवाजी पाडळे, मंदार जोशी, शांताराम इंगवले, दीपक दगडे व पदाधिकारी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, महायुतीची उमेदवार म्हणून माझी उमेदवारी काल जाहीर करण्यात आली आहे. मी कालपासून मुळशी मतदारसंघातील विविध सोसायट्यांतील नागरिकांशी संवाद साधत आहे. यामध्ये या मतदारांच्या समस्या जाणून घेताना असे लक्षात येत आहे की बिल्डर कडून नागरिकांची फसवणूक झाल्याने मोठी गैरसोय होत आहे. मूलभूत सुविंधांचे प्रश्न गंभीर आहेत. सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी जे प्रश्न मांडले आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

बारामतीतील निवडणूक सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे – दीपक मानकर 

दीपक मानकर म्हणाले, बारामती मतदासंघांतील हि निवडणूक पवार विरुद्ध पवार असल्याचे बोलले जाते मात्र हि निवडणूक पवार विरुद्ध पवार नसुन सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे अशी आहे. पुणे महापालिकेमध्ये नव्याने समावेश झालेल्या बावधन भागात पाण्याची तसेच मूलभूत सुविधांचे प्रश्न आहेत. महापालिकेकडून या भागात अद्याप पुरेसे लक्ष दिले जात नाही. परंतू आम्ही या कामाचा पाठपुरावा करून हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू.  नरेंद्र मोदींजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 

Img 20240322 wa00017404573101520546217
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये