पुणे शहर

‘पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’-केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र

सोमवारी मोहोळ संरक्षणमंत्र्यांनाही भेटणार
 
पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले असून, संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी भारतीय हवाई दलाला सूचना द्याव्यात, अशी विनंती पत्रात केली आहे. पुणे विमानतळाची सध्याची धावपट्टी भारतीय हवाई दलाच्या मालकीची असल्याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

‘भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे प्रवाशांची वर्दळ असलेल्या व्यस्त विमानतळांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाचा रन वे (धावपट्टी) वाढविण्याची आवश्यकता आहे व सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असे या पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे.

Img 20240610 wa0014234599511973207107

‘युरोपिय देश, अमेरिका, जपान या देशांशी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या वाढीवर त्याचागंभीर परिणाम होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, महाकाय विमानांची (कोड डी/ई प्रकारची विमाने) हालचाल सुलभ करण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज आहे. भारतीय हवाई दलाच्या मालकीच्या पुणे विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. या विस्तारामुळे महाकाय (कोड-डी/ई प्रकारच्या) विमानांची हालचाल सुलभ होईल व आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकेल,’ असेही पत्रात म्हटले आहे.

Fb img 17180177493908840309776594133677

१००० मीटरने विस्तार आवश्यक
 
सध्याच्या धावपट्टीची लांबी २५३५ मीटर आणि रुंदी ४५ मीटर आहे. या धावपट्टीवर आता फक्त AB-321 आकाराचे प्रवासी विमानच उतरू शकते. मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी सुमारे १००० मीटरने वाढवणे आवश्यक आहे.

मोहोळ म्हणाले, पुणे हे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब असल्याने या प्रस्तावामुळे शहराच्या विकासाला आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे १४ जून २०२४रोजी आम्ही पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. त्यावेळी धावपट्टीच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार माननीय राजनाथजींना पत्र लिहिले आहे. सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट्सच्या आवश्यकतांचे पालन करणाऱ्या क्षेत्राचे OLS संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी योग्य सूचना देण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. सोमवारी जाऊन त्यांना भेटणारही आहे.
 

Img 20240610 wa00003121272752325557053
Img 20240614 wa00146014913648272342267
Img 20240620 wa00182917479592532626119
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240607 wa00106155524562941881055
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00116415178194496147748
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00127754739105663743070
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये