पुणे शहर

कोथरूडमध्ये दोन चारचाकी वाहनांवर भले मोठे झाड कोसळले..

एसएनडीटी कॅनॉल रस्त्यावरील घटना

पुणे : एसएनडीटी कॉलेज जवळील कॅनॉल रस्त्यावर एक मोठे झाड उन्मळून दोन वाहनांवर पडल्याची घटना आज  सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.

रस्त्यावर मोठे झाड आडवे पडल्याने काही काळा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तत्काळ अग्निशामक दालने घटनास्थळी पोचून झाड हटवण्यास सुरुवात केली आहे.  सेलेरिओ कार ही रस्त्याने जात होती. तर अल्टो कार रस्त्याच्या कडेला उभा केलेली होती. झाड सेलेरिओ वाहनाच्या बोनेटवर पडल्याने पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अल्टो कारचे या घटनेत नुकसान झाले आहे. सदैवाने कोणाला या घटनेत इजा झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

धोकादायक झाडे पावसाच्या तोंडावर छाटण्याची मागणी होत असताना महापालिकेच्या उद्यान विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजा गोरडे यांनी केला आहे. महापालिकेचा उद्यान विभाग आवश्यकता नसलेल्या झाडांना काढण्याची परवानगी तातडीने देतो. मात्र धोकादायक झाडे काढण्याच्या प्रक्रिया राबवण्यात त्यांना रस नसतो असे राजा गोरडे यांनी म्हंटले आहे.

Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00132425955639205292116
Img 20240404 wa00127754739105663743070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये