पुणे शहर

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाला केंद्राची मंजुरी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने राज्याला मेट्रो विस्ताराचा गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय घेतले.

यामध्ये तीन मेट्रो प्रकल्प तर २ विमानतळांना मंजुरी मिळाली आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील ठाणे रिंग मेट्रो आणि पुणे मेट्रोच्या नव्या लाईनला मंजुरी मंत्रीमंडळाने दिली.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे देशातील ५ मोठ्या महानगरांपैकी एक आहे. पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मेट्रो लाईनचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. यानुसार स्वारगेट ते कात्रज अशी नवीन मेट्रो लाईन करण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. ५.४ किलोमीटरचा हा प्रकल्प असेल. यामध्ये तीन नवीन मेट्रो स्थानके असतील. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २ हजार ९५४ कोटी रुपये असेल. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

Img 20240813 wa0013

मेट्रो मार्गाच्या मंजुरीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने दिलेली मंजुरी हे केलेल्या पाठपुराव्याचे यश आणि पुण्याच्या विकासाबाबत मोदी सरकारची असलेली कटिबद्धता सिद्ध करणारे आहे. काहीच दिवसांपूर्वी पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेत आवश्यक बाबींचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे केला होता. या मंजुरीमुळे सदरील कामाला वेग येणार असून दक्षिण पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर कात्रज ते निगडी हे दोन महत्त्वाची टोके मेट्रोने जोडली जाणार आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.

Fb img 16474137314571819310932637888379

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, ठाणे शहरात वाहतूकीचा विचार करुन, मंत्रीमंडळाने ठाणे रिंग मेट्रोला मंजुरी दिली. यासाठी १२ हजार २०० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्याच्या चारी बाजूंना मेट्रो लाईनचा घेराव असेल. ठाणे रिंग मेट्रो जुन्या रेल्वे स्थानकाला नवीन रेल्वे स्थानकाबरोबर जोडण्याचे काम करेल. यासोबतच बुलेट ट्रेनच्या स्थानकांना जोडेल. ठाणे रिंग मेट्रो मुंबई मेट्रो आणि उपनगरांच्या मेट्रोशीही जोडली जाईल.हा प्रकल्प महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची संयकुत योजना असेल. ठाणे रिंग मेट्रोची लांबी २९ किलोमीटर असेल. यामध्ये २२ मेट्रो स्थानके असतील. या प्रकल्पामुळे २०४५ पर्यंत ८ लाख ७० हजार प्रवाशी प्रवास करतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक विमानतळाला मंजुरी दिली. पश्चिम बंगालच्या बागडोगरामध्ये नवी विमानतळ होईल. बिहारच्या बिहीटामधील सुरक्षा दलाच्या विमानतळाचे विस्तारीकरण करुन सामान्य नागरीकांसाठी सुरु केले जाईल. यामुळे पटना विमानतळावरील भार कमी होईल. या दोन्ही प्रकल्पांसाठी २ हजार ९६२ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये