पुणे शहर

बावधन मध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गोविंदांची धमाल..नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी जल्लोषात साजरी..

बावधन : बावधन मधील नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी तसेच प्रमुख राजकीय व्यक्तींच्या व जमलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जल्लोष पूर्ण वातावरणात फोडण्यात आली. मुंबईच्या जय वरदायिनी गोविंदा पथकाने ही हंडी फोडली.

बावधनच्या तलाठी कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानावर संस्कृती, क्रीडा, साहस अन् अध्यात्माची सांगड असणारा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते , उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तसेच अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमास सुरुवात झाली. 
सिनेअभिनेत्री सई मांजरेकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी भार्गवी चिरमुले यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

नगरसेवक किरण दगडे पाटील यांची दहीहंडी तरुण तरुणी व परिसरातील नागरिकांसाठी कायमच आकर्षणाचा कंद्रबिंदू राहिली आहे, त्यामुळे ही दहीहंडी दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत चालली आहे. या प्रसंगी  हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर थिरकत, गोविंदा आला रे आला चा जयघोष करत तरुणाईने आनंद साजरा केला. क्रांती मळेगावकर यांच्या अप्रतिम सूत्रसंचलनाने कार्यक्रमास वेगळी रंगत आणली.

Fb img 16474137115315333568191096823716

दहीहंडीचे आयोजक भाजप भोर विधानसभा निवडणुक प्रमुख, नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणाले, पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून दहीहंडीचा सर्वत्र नावलौकिक आहे. हे श्रेय दरवर्षी विविध ठिकाणावरून येणाऱ्या सर्व गोविंदा पथकांचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या आनंदात या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला आणि ही भव्य दहीहंडी साकार झाली. अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याबद्दल सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे आणि उपस्थितांचे मी आभार मानतो.

Img 20240404 wa00123413096165072096535
Screenshot 2024 08 20 16 33 27 551301213897430355510
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये