मी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच नागरिक मला पुन्हा कोथरूडकरांची सेवा करण्याची संधी देतील- चंद्रकांत मोकाटे

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विविध प्रभागात आपण विविध विकासकामे केली आहेत या विकासकामांच्या जोरावरच नागरिक मला पुन्हा कोथरूडकरांची सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला.
आज गुरुवारी कोथरूड येथील आशिष गार्डन येथे शिवसेना, ( उ बा ठा )काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, आमच्या आदमी पार्टी आदी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मोकाटे बोलत होते.या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, नगरसेवक चंदू कदम, माजी नगरसेवक शिवा मंत्री, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, स्वप्निल दुधाने, आदी मान्यवर उपस्थित होते.

मोकाटे उबाठा ( महाविकास आघाडी ) तर्फे कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मोकाटे यांना निवडून आणण्याचा सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणायचाच असे सर्व पदाधिकाऱ्यांनी आवाजात सांगत जोरदार घोषणाबाजी केली
मोकाटे यांनी यावेळी बैठकीत बोलताना सांगितले की मी आमदार असताना कोथरूड विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे केली या भागातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी डी पी रस्ते तयार केले मुठा कॅनलच्या बाजूनं सर्व्हिस रोड करण्यासाठी प्राधान्य दिले
नगरसेवक चंदू कदम म्हणाले की आपण आपल्या भागात अनेक विकासकामे केली या कामांच्या जोरावरच नागरिक मोकाटे पुन्हा आमदार करतील.पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम व प्रचार करून महाविकास आघाडीचे उमेदवार मोकाटे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत.












