महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली! आता निकाल…

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि जगाचं लक्ष लागून राहणार आहे. कोर्टात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवला असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने आज लगेच निकाल जाहीर केलेला नाही. पण हा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टीची उत्कंठा शिगेला पोहोचली होती, ती गोष्ट आता लवकरच स्पष्ट होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या (MLA Disqualification) मुद्द्यावर आता निकाल लागणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची खरी? कुणाची बाजू एकदम खरी? कोण खरं आणि कोण खोटं? कुणाच्या वकिलांनी अतिशय योग्य युक्तिवाद केला ते आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतची सर्व सुनावणी पूर्ण झालीय. आता कुणीही युक्तिवाद करणार नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल देखील राखून ठेवला आहे. निकाल कधी लागेल त्याबाबतची माहिती लवकरच समजेल. पण सुनावणीचा शेवट अतिशय रंजक झाला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या युक्तिवादाचा शेवट केला. त्यांनी शेवटच्या क्षणी संस्कृतमध्ये सुभाषित म्हणून युक्तिवादाचा शेवट केला. खरी शिवसेना कुणाची त्याचा निर्णय न्यायालय घेईल, असं म्हणत त्यांनी भावनिकपणे अपेक्षा व्यक्त केल्या.
ठाकरे गटाच्या बाजून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेत मनुसिंघवी या तीनही वकिलांनी युक्तिवाद केला. ज्यांची याचिका दाखल असते त्याच पक्षाला शेवटच्या क्षणी कोर्टात रिजॉईंडर करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांना ती संधी मिळाली.



