पुणे शहर

पौड रस्त्यावर राबवले गेले “मेगा डिप क्लिनिंग ड्राईव्ह” अभियान

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने अभियान..

कोथरूड : “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन  २०२४ – २५ अंतर्गत कोथरूड मधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाण पूल, पौड फाटा चौक ते चांदणी चौकापर्यंतच्या दुतर्फी पौड रस्त्यावर कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभाग व इतर सर्व खात्याच्या वतीने “मेगा डिप क्लिनिंग ड्राईव्ह” “सुक्ष्म महास्वच्छता अभियान” राबवण्यात आले.

Img 20240404 wa00142747383113629703933

यावेळी अनाधिकृत बांधकाम व हॉटेलवर समोरील शेडवर कारवाई करत सुमारे १२५०० फुटाचे क्षेत्र रिकामे करण्यात आले. तसेच पौड रोडवरील खाली वाकलेले लाईटचे दिवे व सिग्नल, सीसीटिव्ही कॅमेरे, एकूण ३० वृक्षांची छाटणी करून फांद्या व पाला उचलण्यात आला तसेच झाडाच्या बुंध्यातील १० पिंजरे, लटकणाऱ्या केबल वायरी तोडण्यात आल्या.

या अभियानात १२७ व्यवसायिक तसेच १७ अनाधिकृत शेड उभारणाऱ्या व्यवसायिकांवर संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. धडक कारवाईत एक जेसीबी व चार ट्रकचा वापर करण्यात आला. तसेच काही हातगाडी, भाजीवाले, पथारीवाले या व्यवसायिकांवर  देखील कारवाई करण्यात आली. या अभियानात ८५ टण राडारोडा, ११ टण कचरा जमा करून उचलण्यात आला. तसेच अस्वच्छता करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ईत्यादी कारणासाठी एकूण ४७ व्यवसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ३३,७५०/- रुपये शुल्क वसूल करण्यात आले.

कै. अण्णासाहेब पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून स्वच्छतेची शपथ दिली. तसेच पौड फाटा चौकात रांगोळी काढून उपस्थिताना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत पुणे शहराला एक नंबर आणण्यासाठी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

सदर अभियान महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., यांच्या आदेशावरून घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, तसेच परिमंडळ  कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सपकाळ तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार,प्रमोद चव्हाण, जया सांगडे, हनुमंत चाकणकर, रूपाली शेडगे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश चौंधे तसेच कनिष्ठ अभियंता संतोष गायकवाड व सर्व अभियंता, अतिक्रमण निरिक्षक, आकाश चिन्ह, उद्यान व बांधकाम निरिक्षक तसेच मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे, लक्ष्मण सोनवणे, विजय पाटील, संजय कांबळे यांच्या समन्वयाने राबवण्यात आले.  एकूण ४६७ सफाई कामगार या अभियानात सहभागी सहभागी झाले होते. 

Img 20241020 wa00013699867278209296534

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये