कोथरुड

भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर भागात पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी उपाययोजना सुरू : अल्पना वरपे

कोथरुड : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात प्रभाग दहा मधील भुसारी कॉलनी बरोबर इतर भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरणे, सीमा भिंत कोसळणे,  वस्ती विभागातील घरांमध्ये पाणी शिरणे असे प्रकार घडले. या दिवशी स्थानिक नगरसेविका अल्पना वरपे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पण अतीवृष्टी होण्यापूर्वीच वरपे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांना निवेदन देऊन पावसात घडणाऱ्या घटना टाळण्यासाठी उपयोजना करण्याची मागणी केली होती.

पाऊस पडल्याच्या दुसऱ्या दिवशीच वरपे यांनी या भागातील पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ व पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणीचे नियोजन केले. यावेळी सहाय्यक महापालिका आयुक्त संदिप कदम, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे येवलेकर, कनिष्ठ अभियंता स्वप्निल खोत, उमेश कुरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे उपस्थित होते. पाहणी दरम्यान महापौर मोहोळ यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Img 20201016 wa0103
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करताना महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेविका अल्पना वरपे व महापालिका अधिकारी

बुधवारच्या पावसात डावी भुसारी काॅलनी येथे सुरक्षा भींत कोसळण्याचा प्रकार घडला त्याबरोबरच , उजवी भुसारी लेन नं २ मधील सोसायट्या, कोथरूड डेपो चौक व कलाग्राम सोसायटी येथील तळ मजल्यावरील फ्लॅट व दुकाने, इंदीरा शंकरनगरी येथील घरे, मेट्रो स्टेशन शेजारील सोसायट्या, आसावरी सोसायटी, या बरोबरच वस्ती विभागातील शास्रीनगर, शिवांजली मंडळाजवळ, हमराज चौका जवळील मोहोळ चाळ, लाल बहादूर शास्री चाळ, सागर काॅलनी, श्रीकृष्णनगर येथील नाल्या लगत असलेल्या अनेक घरात पाणी शिरले व त्यांचे नुकसान झाले, परमहंस नगर येथील नाल्यालगतच्या सोसायटी व बंगल्यांमध्ये देखील पाणी शिरले. या सर्व ठिकाणी लगेचच उपाययोजना करून कामाला सुरवात करण्यात आली असल्याचे वरपे यांनी सांगितले.

वरपे यांनी म्हंटले आहे की महापालिकेकडून
नाल्यांची फक्त वरचेवर साफसफाई न करता दरवर्षी पावसाळ्या आगोदर त्यांच्या खोली व रुंदीवर काम होणे गरजेचे आहे. डोंगर उताराकडून येणारे व रस्त्यांवरून वाहणारे पाणी वस्ती विभाग व सोसायट्यांमध्ये शिरून नुकसान होऊ नये याकरिता स्ट्रोम वाॅटर लाईन नव्याने बांधणे व जुन्या सक्षम करणे गरजेच्या आहेत त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्याबरोबरच वस्ती विभागात पाणी शिरू नये यासाठी शास्त्रीनगर स्मशानभूमी ते श्रीकृष्णनगर सागर कॉलनीपर्यंत नाल्यालगत भिंत बांधण्याची मागणी केली आहे. कालच्या पावसात नाल्यालगतच्या बर्‍याच घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांना काहीप्रमाणात महानगरपालिके तर्फे नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार चंद्रकांत पाटील, भीमराव तापकीर यांनी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील संबंधीत विभागाला केल्या आहेत त्यानुसार प्राथमिक उपाययोजनांचे काम देखील प्रत्यक्षात चालू झाले असल्याचे वरपे यांनी सांगीतले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये