रक्तदानातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली..

शिवसेना झाशी राणी लक्ष्मीबाई चौक शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..
पुणे : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना झाशी राणी लक्ष्मीबाई चौक या शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी २२० रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. शिबिराचे उद्घाटन डॉ. लोहिया यांचे हस्ते करण्यात आले. सदर शिबिराचे संयोजन पुणे शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, शिवसेना शहरसमन्वयक विलास सोनवणे यांनी केले होते.
शिबिर यशस्वी होण्याकरिता तेजस मर्चंट, अजित जाधव, हरिश्चंद्र सपकाळ, राहूल मोरे, गणेश खलाटे, राजेश गायकवाड, राज बधे, विकी पवार, श्रेयस कुमावत हयांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमात शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, तसेच प्रविण डोंगरे, उमेश वाघ, असुतोष मोकाशी, मकरंद पेठकर, अनिल बहिरट, मंगेश खेडेकर, राहूल दुर्गे, इम्रान खान, राजेश मांजरे इ. शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.







