‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी ऐतिहासिक वेषभुषा करत प्रेक्षक कोथरूड सिटी प्राईडमध्ये आणि महाराजांच्या जयघोषाने चित्रपटगृह दणाणले..

पुणे : सिटी प्राईड कोथरूड चित्रपटगृहात जवळपास १०० च्या वर शंभू प्रेमी छावा चित्रपट पाहण्यासाठी एकत्र ऐतिहासिक वेषभुषेत आल्याने चित्रपटगृहाचे आवार छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोषाने निनादून गेले.
रविवारी कोथरूड सिटी प्राईड मध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी कोणी छत्रपती शिवाजी महाराज, कोणी छत्रपती संभाजी महाराज, तर कोणी हंबीरराव मोहिते, राजमाता जिजाऊ माँसाहेब, येसूबाई, सावित्रीबाई फुले, कोणी सरदार, कोणी मावळे अश्या वेगवेगळ्या वेषात आले होते. यावेळी ढोल ताशा गजरात छोटीशी मिरवणूक काढत औक्षण, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.
यावेळी उत्कृष्ठ वेषभुषेसाठी छत्रपती शिवाजी महाराज – शोभा बल्लाळ, छत्रपती संभाजी महाराज- माया एडके, राजमाता जिजाऊ – वैशाली दाते, येसूबाई राणीसाहेब-उज्वला सातव, हटके वेषभुषेसाठी – सुरेखा वाबळे आणि लकी ड्रॉ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची वेषभुषा केलेल्या शोभा बल्लाळ आणि माया एडके या दोघींचे त्यांनी विशेष कौतुक केले. छावा चित्रपट पाहण्यासाठी एक वेगळा आणि चांगला कार्यक्रम राबवला गेल्याने त्याची चर्चा सर्वत्र होती. यावेळी परीक्षक म्हणून रोहिणी मानकर आणि विद्या ठाकूर यांनी काम पाहिले.
यावेळी क्षितिज जी दंताळे ग्रुप कडून सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली आणि सर्व महिलांना गिफ्ट कुपन देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख बाळकृष्ण नेहरकर यांनी सांगितले कि या कार्यक्रमाचे सर्व श्रेय ह्या सोहळ्याला सहकार्य केलेल्या आणि सहभागी झालेल्या सर्वांचे आहे.



यावेळी खासदार प्रा. डॉ. मेधा ताई कुलकर्णी, CMD दंताळे ग्रुप्स चे क्षितिज दंताळे, श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश भोज, उद्योजक नारायणराव शिंदे उपस्थित होते.
या कलात्मक कार्यक्रमाचे आयोजन छावा चित्रपट ऐतिहासिक सोहळा कमिटी, ब्राईट फ्युचर क्लब, पुणे, स्वच्छंदी मैत्री कट्टा पुणे, कृष्णा स्टुडिओ कोथरूड, काव्यानंद साहित्य कला पुणे स्वच्छंदी सखी ग्रुप, पुणे यांनी केले होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून शोभा बल्लाळ, सुनंदा डेरे, मनाली सोनावणे, अपर्णा काळे यांनी काम पाहिले.






