पुणे शहर

दहा लाखांची रोकड हिसकावून पळालेल्या दोघांना अटक

पुणे – (विशेष प्रतिनिधी) खडकी बाजार येथील महालक्ष्मी ज्वेलर्स जवळ ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील दहा लाख रुपये रोकड लंपास करणाऱ्या दोघानां खडकी पोलिसांनी रोख रकमेसह अवघ्या सहा तासात जेरबंद केले. याप्रकरणी आरोपी चेतन मंगेश गोडसे (वय २८ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे) व आकाश कैलास माळी( वय २५ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास, अमिर युसुफ सय्यद( वय ६६ वर्षे) यांचे हातातील रोख रक्कम रुपये १० लाख रोकड असलेली बॅग दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती.

Img 20250310 wa02324095435649637866308

काळ्या रंगाच्या, पाठीमागे व पुढे नंबर प्लेट न लावलेल्या व्हेस्पा कंपनीचे मोटर स्कुटरवरुन आलेल्या व तोंडास रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमांनी अमिर सय्यद यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी जबरीने खेचुन पलायन केले होते. या गंभीर पुण्याची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यांनी भेट देवून तपासाच्या सूचना दिल्या. खडकी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीच्या बी.एन.एस. कलम. ३०९ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास चालु करण्यात आला होता. गुन्ह्यामध्ये आरोपी इसमांनी जबरी चोरी करताना त्याची ओळख पटणार नाही या दृष्टीने चेहरा रुमालाने पुर्णपणे बांधुन तसेच वाहनास नंबर प्लेट न लावता रोकड घेवुन पलायन केले होते.
याबाबत खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले यांनी तपासपथकाच्या अंमलदारांसह तांत्रिक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे अज्ञात आरोपींचा तपास सुरू केला. अवघ्या ०६ तासाचे आत या गंभीर गुन्ह्यातील आरोपी यांना चाकण येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चोरी केलेल्या आरोप दहा लाख रुपये रकमेसह ताब्यात घेतलेले आरोपी चेतन मंगेश गोडसे व आकाश कैलास माळी यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील जबरीने चोरण्यात आलेले १० लाख रुपये रोकडसह गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह दोन्ही आरोपींना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

Img 20250310 wa02282851203640248970727

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ 4 चे पोलीस उपआयुक्त हिमंत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग विठ्ठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, पोलिस हवालदार संदेश निकाळजे, अंमलदार ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, सुधाकर तागड,दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये