पुण्यात इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे एल्गार आंदोलन..

पुणे : केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाई धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पुणे शहराच्या वतीने एल्गार आंदोलन घेण्यात आले. डेक्कन येथील कलाकार कट्टा येथे पार पडलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सध्या कच्च्या तेलाच्या किंमती चार वर्षाच्या तुलनेत निचांकी पातळीवर (प्रती बॅरल$65.41) घसरल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2021मध्ये किंमत प्रति बॅरल $63.40होती.या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहचले आहे. रेटिंग एजन्सीनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर ₹12 – 15 आणि डिझेलवर प्रति लीटर ₹6.12नफा कमावत आहेत. असे असूनही, तेल कंपन्यानी गेल्या एक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

यावेळी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे युवक अध्यक्ष किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, दीपक कामठे, उदय महाले, विक्रम जाधव, प्रविण आल्हाट, शैलेन्द्र चव्हाण, नीलेश वरे, समीर पवार , रोहन पायगुडे, गिरीश गुरूंनानी, सागर खांदवे, अजय पवार, गौरव जाधव देवा वाल्हेकर, ऋषिकेश देखणे, किशोर भगत, राजेंद्र पवार, अतिक तांबोळी यांच्यासह युवक पुणे शहर व मतदार संघ पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी १मोदी सरकार चोर है, वाह रे मोदी तेरा खेल … सोने के भाव में मिलता तेल, पेट्रोल, डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत महागाई विरोधात निषेध नोंदवला.






