कोथरुडपुणे शहर

भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पदी निलेश कोंढाळकर, तर कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्षपदी कुलदीप सावळेकर आणि कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदी लहू बालवडकर यांची निवड

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मध्य मंडल अध्यक्षपदी निलेश कोंढाळकर यांची निवड करण्यात आली आहे. तर दक्षिण मंडल अध्यक्षपदी कुलदीप सावळेकर आणि कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदी लहू बालवडकर यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहेत. याचाच भाग म्हणून राज्यात दोन दिवसांपूर्वी मतदार संघांसाठी मंडल अध्यक्षपद निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

या निवडणूक प्रक्रियेत निलेश कोंढाळकर, लहू बालवडकर, कुलदीप साळवेकर यांना मंडल अध्यक्ष म्हणून पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याने त्यांची निवड आज जाहीर करण्यात आली.

कोथरूड मतदारसंघात यावेळी दोन ऐवजी तीन मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोथरूड मंडल अध्यक्ष पदी निलेश कोंढाळकर यांची निवड करण्यात आली. तर कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्षपदी कुलदीप सावळेकर आणि कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदी लहू बालवडकर यांची निवड करण्यात आली आहे.

आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, यांनी नवनियुक्त मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, लहू बालवडकर, कुलदीप साळवेकर यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Img 20250310 wa02324095435649637866308
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये