पुणे शहर

कोथरूड अपघातातील जखमींचा खर्च उचलून चंद्रकांत पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कोथरूड : कोथरुडमधील भुसारी कॉलनी जवळ पीएमपीच्या बसचे ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले असून; यांच्यावर उपचारासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. जखमींना सह्याद्री रुग्णालयात दाखल करुन त्यांचा उपचाराचा सर्व खर्च उचलून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262


मंगळवारी संध्याकाळी कोथरुड डेपोकडे येणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले, तर तीन जण जखमी झाले. या जखमींना जवळच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या घटनेची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना समजताच; त्यांनी जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, सर्व उपचाराचा खर्च उचलून कुटुंबियांना धीर दिला. पाटील यांच्या संवेदनशीलतेचे कोथरुड मधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये