पुणे शहर

“पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोषात स्वागत”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा आज पुणे शहरात दाखल झाली. यावेळी शहर अध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचे लालमहाल, कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे.

महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचा साने गुरुजी भवन,हडपसर येथून शुभारंभ करण्यात आला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्री माई फुले यांच्या समता भूमी, गंज पेठ येथील पुतळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांनी हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर महात्मा फुले पेठ येथून लक्ष्मी रोड मार्गे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन लालमहाल,कसबा पेठ येथे दाखल झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी “जय भवानी,जय शिवाजी”, “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज” यांच्या जयघोषाने परिसर शिवमय झाला होता.

Img 20250429 wa00235865012213135185616

शहराध्यक्ष दीपक मानकर बोलताना म्हणाले, “महाराष्ट्र गौरव मंगल कलशामध्ये लालमहाल, सिंहगड किल्ला,शनिवारवाडा, लहूजी वस्ताद साळवे स्मारक, समता भूमी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील माती तसेच इंद्रायणी, मुळा-मुठा संगम येथील पाणी, महात्मा फुले वाडा येथील विहिरीचे पाणी हे टाकण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस लतीफ लतीफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब बोडके, शांतीलाल मिसाळ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे, महेश हांडे,विधानसभा अध्यक्ष हडपसर शंतनू जगदाळे, शिवाजीनगर अभिषेक बोके, महिला अध्यक्ष कसबा सुप्रिया कांबळे,पुणे कॅन्टोन्मेंट नीता गायकवाड,कोथरूड तेजल दुधाणे,शहर सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, आयटी सेल मोहन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मारुती अवरगंड, युवक अंगद माने, शहर सरचिटणीस शितल जौंजाळ, शलाका पाटील, शालिनी जगताप,उदयसिंह मुळीक, उध्वद बडदे,उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, डिंपल इंगळे, आनंद तांबे, चिटणीस शाम शेळके, चेतन मोरे,विशाल कांबळे, दिनेश अर्दाळकर, विधानसभा कार्याध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट गोरखनाथ भिकुले, शिवाजीनगर बाळासाहेब आहेर,हडपसर अमर तुपे, पदाधिकारी योगेश वराडे,  शहर महिला कार्याध्यक्ष संगीता बराटे, गौरी जाधव, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, सागर चंदनशिवे, सुरज गायकवाड,युवती कार्याध्यक्ष नम्रता बोंदर, लावण्या शिंदे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विक्रम मोरे,वैद्यकीय मदत कक्ष वंदना साळवी, महिला उपाध्यक्ष मनिषा किराड, पूनम पाटोळे,रोशन कुरेशी, संघटक सचिव प्रीती डोंगरे, चिटणीस सुनिता बडेकर,  सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, आयटी सेल संजय खंडारे,युवक अध्यक्ष कसबा गजानन लोंढे, श्वेता मिस्त्री, पुणे कॅन्टोन्मेंट प्रसाद चौगुले,विद्यार्थी अध्यक्ष कोथरूड अनिकेत मोकर,   विधानसभा उपाध्यक्ष संतोष हत्ते, सुप्रिया साठे   यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
                                                             

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262
Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये