कोथरुड

कोथरूडमध्ये योग दिनाचे औचित्य साधून वस्ती भागातील १००० मुलींची योग प्रात्यक्षिके..मानसी उपक्रमातील मुलींचा उत्स्फूर्त सहभाग

प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : महिलांचे जीवन अतिशय खडतर असते. त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. आनंदी जीवनासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मानसी उपक्रमामुळे कोथरुड मधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून, आगामी काळात पुणे शहरात ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Img 20250620 wa02024821030851210424582

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या ‘मानसी’ उपक्रमातील मुलींचे एकत्रिकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते. जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके सादर केली.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

यावेळी माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, योग गुरू मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Img 20250618 wa02555226425519435283235

पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. स्त्रित्वाने मासिक पाळी, प्रसूती वेदना, अशा विविध आव्हानांवर मात करत, त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत. ह्या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, या कार्यक्रमाअंतर्गत मानसी उपक्रमातील १००० मुलींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

Fb img 17504091365544003329223830035639
Fb img 17504091455137654765988554475245
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये